mahajyoti IBPS PO, LIC AAO Pre Exam Training 2023-24 | mahajyoti free traning 2023

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर मार्फत राज्यातील नॉन क्रिमीलेअर गटातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यासाठी IBPS PO, LIC AAO मोफत प्रशिक्षण योजना.

2024 मध्ये होणाऱ्या परीक्षांकरिता इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती – भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील 600 विद्यार्थ्यांना 2023-24 मधील सत्रातील परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी मोफत अनिवासी पध्दतीने महाज्योती मार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

योजनेचे स्वरुप :या परीक्षा पुर्व प्रशिक्षणासाठी पात्र नॉन क्रिमीलेअर गटातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत अनिवासी प्रशिक्षण देण्यात येते. प्रशिक्षणाचा कालावधी :- 6 महिन्यांकरिता विद्यावेतन :- रु.6000/- प्रती माह (किमान 75% हजेरी असल्यास)

प्रशिक्षणार्थी संख्या :- नागपूर – 300 , छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) – 300.

अ. योजनेच्या लाभासाठी पात्रता: 1. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
2. विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती-भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा/असावी.
3. विद्यार्थी नॉन-क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा/असावी
4. विद्यार्थी पदवीचे शिक्षण पूर्ण केलेला किंवा पदवीच्या अंतिम वर्षाला असणारे विद्यार्थी सुध्दा या प्रशिक्षणाकरिता अर्ज करु शकतात.
5.वयोमर्यादा :- 20 ते 33 वर्ष
ब. अर्ज करण्यासाठी आवश्यक वैयक्तिक कागदपत्रे: 
1. आधार कार्ड
2. जातीचा प्रमाणपत्र
3. वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र
4. 12 वी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र
5. पदवी उत्तीर्ण गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र
6. पदव्युत्तर उत्तीर्ण गुणपत्रक किंवा पदव्युत्तरच्या शेवटचा वर्षाचे प्रमाणपत्र
7. दिव्यांग असल्यास 40% पेक्षा जास्त प्रमाणात असलेल्या दिव्यांगत्वाचा सक्षम प्राधिकाऱ्याचा दाखला
8. बॅकेचे खाते आधारकार्ड क्रमांकाशी संलग्न असावे.
क. अर्ज कसा करावा.
1. महाज्योती या संकेतस्थळावर जाऊन नोटीसबोर्ड येथे जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा.
2. अर्जासोबत ‘ब’ मध्ये नमूद कागदपत्रे स्वाक्षांकीत करुन स्पष्ट दिसतील असे स्कॅन करुन अपलोड करावे.
3. पदवीच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्याथ्यांचे महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र अर्जासोबत जोडावे.
ड. आरक्षण :-
1. इतर मागासवर्ग, विमुक्त जाती – भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील 30% जागा महिलांसाठी आरक्षित आहे.
2. अनाथांसाठी 1% जागा आरक्षित आहे.
इ. प्रशिक्षणाच्या अटी व शती :
1. अर्ज करण्याचा अंतिम दि.21/09/2023 आहे.
2. विहित नमुन्यामध्ये कागदपंत्रासहित अर्ज केलेल्या पात्र विद्यार्थ्यांची छाननी परीक्षा घेऊन प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येईल.
3. प्रशिक्षणाकरिता निवड झालेले विद्यार्थी ज्या दिनांकास रुजु होतील त्या दिवसापासून त्यांना रु.6000/- प्रति महिना या दराने विद्यावेतन लागू होईल. प्रत्यक्ष प्रशिक्षणास 75% उपस्थिती असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच विद्यावेतन देण्यात येईल.
4. विद्यार्थ्यांनी विद्यावेतन जमा करण्यासाठी आधार क्रमांकाशी संलग्न बँक खाते देणे अनिवार्य आहे.
5. महाज्योतीकडे अंतिम निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी सारथी, पुणे या संस्थेकडील याच परीक्षेचा प्रशिक्षणाचा लाभ घेतलेला नसावा. तसेच महाज्योती कडील सदर प्रशिक्षणाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रशिक्षण योजनेचा लाभ घेतलेला नसावा. विद्यार्थ्यांनी अशा प्रकारचा दुबार लाभ घेतल्याचे निदर्शनास आल्यास विद्यार्थ्वांविरुद्ध नियमाप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल.
6. सदर प्रशिक्षणासाठी अंतिम निवड झालेल्या विद्यार्थ्यांने वरील अटी व शतींचा भंग केल्याचे तसेच चुकीची किंवा खोटी कागदपत्रे/ माहिती सादर केल्यास त्यांचेवर झालेल्या प्रशिक्षण खर्चाची त्यांचेकडुन वसुली करण्यात येईल व यापुढे महाज्योतीच्या कोणत्याही योजनांचा लाभ घेण्यास ते पात्र असणार नाही.
7. नमुद निकषांची पूर्तता न करणाऱ्या, अपूर्ण अर्ज सादर करण्याऱ्या किंवा अर्जासोबत कागदपत्रे सादर न करणाऱ्या विद्यार्थ्यांचा अर्ज बाद करण्यात येईल.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *