barti pune free courses 2023 | barti Free Skill Development Training

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (‘बार्टी’) आणि लर्नेट स्किल्स लिमिटेड यांच्या तर्फे महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांतील अनुसूचित जातीतील विद्यार्थी – विद्यार्थिनीसाठी पुणे येथे मोफत प्रशिक्षण व नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.

Dr. Babasaheb Ambedkar Institute of Research and Training ('BARTI') and LEARNET SKILLS LIMITED have provided free training and job opportunities in Pune for Scheduled Caste students from all districts of Maharashtra.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे व लर्नेट स्किल लिमीटेड यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जातीच्या युवक आणि युवतींसाठी, पुणे येथे मोफत प्रशिक्षण व नोकरीची सुवर्णसंधी

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था आणि लर्नेट स्किल्स लिमीटेड यांच्या तर्फे गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण आणि या प्रशिक्षणानंतर नोकरी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आर्थिक अडचणींमुळे उच्च शिक्षण घेता येत नाही आणि त्यामुळे नोकरी मिळणे अवघड असते. परंतु, कमीत कमी ८ ते १० वी शिक्षण झालेल्यांसाठी हा खास उपक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था यांच्यातर्फे राबविण्यात येत आहे.  महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांतील अनुसूचित जातीतील विद्यार्थी या प्रशिक्षणासाठी अर्ज करू शकतात. तसेच, विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण पुण्यातील लर्नेट स्किल्स लिमीटेड (सी. आय. ई इंडिया इन्स्टिटयूट ऑफ स्किल्स, भोसरी , पुणे) येथे होणार आहे.
” अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षणादरम्यान बार्टी संस्थेमार्फत दरमहा ४,000/- ते ६,000/- शिष्यवृत्ती “

प्रशिक्षणाचे इतर फायदे  :-

१. इंग्रजी भाषेचे प्रशिक्षण
२. व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण
३. संगणक व उद्योजकीय प्रशिक्षण
४. मोफत प्रशिक्षण साहित्य (पुस्तके, गणवेश, शैक्षणिक साहित्य, वही, पेन, इ.)
५. इंडर्स्ट्रिअल वेल्डर प्रशिक्षणाकरिता आंतरराष्ट्रीय / राष्ट्रीय संस्थेचे प्रमाणपत्र
६. १०० %  नोकरीची हमी
आवश्यक कागदपत्रे  :-
१. जातीचा दाखला
२. आधार कार्ड
३. शैक्षणिक प्रमाणपत्र
४. रेशन कार्ड
५. राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुकचे पहिल्या पानाची छायांकित प्रत
पात्रता निकष :-
१. केवळ अनुसूचित  जातीतील प्रशिक्षणार्थी असावा
२. महाराष्ट्रातील रहिवासी
३. वयोमर्यादा १८  ते ३५  
४. किमान ८ वी पास

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ ऑगस्ट २०२३.
बॅच सुरु होण्याचा दिनांक – १ सप्टेंबर २०२३

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *