सध्या बॉलिवूड सिनेसृष्टीत जवान चित्रपट धमाकेदार कामगिरी करत असुन प्रेक्षक वर्गातून या चित्रपटाकरिता उदंड प्रतिसाद प्राप्त होत असल्याचे दिसून येत आहे. जवान हा चित्रपट रिलीज झाल्याच्या अगदी काही दिवसातच कोट्यवधी रुपयांचा गल्ला या चित्रपटाने केल्याचे दिसून येत आहे.

चित्रपटातील पात्रे –
रिलीज डेट – ७ सप्टेंबर
चित्रपटाचा कालावधी -2h 49m
दिग्दर्शक – अँटली
प्रोड्युसर – गौरी खान
चित्रपटातील नायक / नायिका – शाहरुख खान, नायथारा, दीपिका पदुकोन, विजय सेतूपती, सानया मलोहतरा, प्रियामणी, गिरीजा ओक, लहर खान, सुनील, संजिता भट्टाचार्य, रिद्धी डोग्रा, आलिया कुरीशी.

स्टोरी
नुकताच प्रसीद्ध झालेला जवान चित्रपट हा एका विक्रम राठोड या एका सैनिकी व्यक्तीच्या आयुष्यातील प्रसंगावर आधारित आहे. या चित्रपटात सुप्रसिद्ध कलाकार शाहरुख खान हा मुख्य नायकाच्या भूमिकेत आहे.
सुरुवातीलाच रक्तबंबाळ झालेला विक्रम राठोड एका आदिवासी लोकांना सापडतो आणि त्याची स्मृती जाते त्यानंतर ३० वर्षानंतर चा काळ पहायला मिळतो.
यात जवान विक्रम राठोड शूर पराक्रमी असल्यामुळे सैनिकी बनावट हत्यारे तयार करणाऱ्या कंपनीच्याम्हणजेच विजय सेतुपती या खलनायकाच्या विरोधात आवाज उठवतो पण… राजकारण यामुळे विजय सेतुपती जवानाला देशद्रोही ठरवून मारतो . त्याच्या पत्नीला अर्थात दीपिका पदुकोण लाही फाशीची शिक्षा सुनावली जाते परंतु ते प्रेग्नेंट असल्यामुळे मूळ ५ वर्ष होईपर्यंत शिक्षा पुढे देण्यात येते. त्यानंतर विक्रम राठोड चा मुलगा जेलरच्या घरी लहानाचा मोठा होतो आणि आपल्या वडिलांचा व आईच्या मृत्यूचा बदला घेतो.
विक्रम राठोड चा मुलगा नंतर आपल्या वडिलांच्या नावाने देशातील शेतकरी आत्महत्या, शासकीय दवाखान्यातील अपुऱ्या सुविधा यामुळे लहान मुलांचे गेलेले प्राण अश्या प्रसंगांचा समावेश केलेला आहे. विजय सेतुपती हा खलनायकाच्या भूमिकेत असून उत्तम भूमिका त्यांनी साकारली आहे. लष्कराला हत्यारे पोचवण्यापासून तो राजकारणापर्यंत पोहचतो. त्यानंतर आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी विक्रम राठोड चा मुलगा आझाद सुरुवातीला आपल्या लेडीज साथीदारांच्या मदतीने ट्रेन हायजॅक करतो आणि विजय सेतुपती हा खलनायकाकडून कोट्यवधी रुपयांची मागणी करतो. अगदी डोळ्यांचे पारणे फिटेल अशी तसेच विनोदी डायलॉग आणि गाण्यांची मैफिलीत हे सीन रंगवले आहे. त्यांनतर आझादला पडकण्यासाठी नायनाथरा ही पोलीस अधिकारी म्हणून काम पाहत असते. बायमिस्टेकली आझाद आणि नायनाथरा यांचा विवाह होतो. आझाद आपल्या पत्नीला सांगण्याचा प्रयत्न करतो पण वेळ निघून जाते. त्यानंतर मधेच विक्रम राठोड ची दमदार एंट्री पहायला मिळते. विक्रम राठोड आपली स्मृती विसरून गेलेला असतो पण त्याचे मित्र मात्र शेवटपर्यंत त्याला साथ देतात. शेवटी विक्रम राठोड आणि आझाद बापलेक मिळून व्हिलन विजय सेतुपतीला अद्दल घडवतात.
चित्रपटाच्या यशस्वितेचे कारण –
