रत्नागिरी जिल्ह्यात १२० पोलीस पाटील पदासाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरु झाली असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत .

पोलीस पदासाठी आवश्यक पात्रता –
१. अर्जदार किमान १० वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
२. वयोमर्यादा ४ सप्टेंबर पर्यंत विचारात घेतले जाईल. वय ४ सप्टेंबर २०२३ रोजी २५ पेक्षा कमी व ४५ पेक्षा जास्त नसावे.
३. अर्जदार हा स्थानिक रहिवाशी असावा. ऑनलाईन अर्ज करतेवेळी ओळखपत्र – रेशनकार्ड, मतदानकार्ड, आधारकार्ड, स्वयंघोषपत्र किंवा ज्या पुराव्याने आपले वय सिद्ध होईल असा पुरावा. मुलाखतीच्या वेळी सदर पुरावा सादर करणे बंधनकारक राहील.
४. अर्जदाराने आपला मोबाईल क्रमांक व स्वतःचा इमेल आयडी नोंदविणे बंधारकारक असेल.
५. अर्जदार हा शारीरिक दृष्ट्या सक्षम असावा व चारित्र्य निष्कलंक असावे.
६. अर्जदाराने महाराष्ट्र राज्य सेवा (लहान कुटूंबातील प्रतिज्ञापत्र ) नियम २००५ मधील लहान कुटुंबाची अहर्ता धारण करणे आवश्यक आहे. अर्जदारास दोनपेक्षा अधिक अपत्ये नसावीत.
७. अनु. जाती, अनु जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, वि जा या व भ. ज ब , क, ड च्या आरक्षित पदाकरिता जातीचा दाखल सादर करणे बंधनकारक असणार आहे.
७. जे उमेदवार नॉनक्रिमीलेअर उत्पन्न गटात मोडत असतील तर तसे प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
८. पोलीस पाटील पदासाठी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
लेखी परीक्षेचे स्वरूप – एकूण १०० गुणांची परीक्षा