नमस्कार मित्रांनो आजच्या या ब्लॉगमध्ये आपण Sanjay Gandhi Niradhar Yojana Maharashtra 2024 जी संपूर्ण महाराष्ट्र मध्ये राबवली जाते या योजनेविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत या योजनेच्या माध्यमातून समाजातील निराधार व्यक्ती तसेच अपंग दिव्यांग व्यक्तींना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक स्वरूपात पाठबळ दिले जाते या योजनेमार्फत अनेक लाभार्थी सध्या लाभ घेत आहेत
Sanjay Gandhi Niradhar Yojana Maharashtra 2024 | संजय गांधी निराधार योजनेबद्दल माहिती
Table of Contents
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संजय गांधी निराधार योजना राबवली जाते या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील जे दुर्बल व निराधार घटक आहेत तर या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना दर महिन्याला पंधराशे रुपये इतके अनुदान त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते. सध्या ज्यांचं वय पन्नास वर्षापेक्षा जास्त आहे अशा सर्व लाभार्थ्यांना दर तीन वर्षांनी आहे तिचे प्रमाणपत्र दाखल करण्याची मुभा देण्यात आले आहे तर जे लाभार्थी आहेत यांच्यापर्यंत ही महत्त्वाची माहिती नक्की पोहोचवा
Sanjay Gandhi Niradhar Yojana Maharashtra 2024 | योजनेसाठी कोण कोण पात्र
- तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याची पत्नी या योजनेसाठी लाभ घेऊ शकते
- पस्तीस वर्षाखालील अविवाहित स्त्री असेल या योजनेचा लाभ घेऊ शकतात
- घटस्फोट प्रक्रियेतील किंवा घटस्फोट झालेल्या महिला ज्यांना पोरगी मिळत नाही अशा महिला अर्ज करू शकतात
- वैशा व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला
- आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी
- तृतीयपंथी
- 35 वर्षाखालील अविवाहित स्त्री
- अपंग यामध्ये अंध, मूकबधिर, कर्णबधिर, मतिमंद इत्यादी स्त्री पुरुष
- क्षयरोग कर्करोग एड्स कुष्ठरोग यांसारख्या आजारामुळे स्वतःचा रोजगार चालू न शकणारे स्त्री पुरुष
- निराधार महिला निराधार विधवा
- अठरा वर्षाखालील अनाथ बालक
Sanjay Gandhi Niradhar Yojana Maharashtra 2024 | अटी व पात्रता
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा
- लाभार्थी व्यक्तीचे वय 65 वर्षाखालील असणे आवश्यक
- अर्जुनाकडे उत्पन्नाचे कोणतेही माध्यम नसावे
- अर्जदारचे नाव दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाचे यादीत असणे आवश्यक आहे
- मुलींच्या बाबतीत लग्न होईपर्यंत किंवा तिला नोकरी मिळेपर्यंत (शासकीय /निमशासकीय/ खाजगी) लाभ मिळेल याच अनुषंगाने नोकरी करणाऱ्या (शासकीय /निमशासकीय/ खाजगी) अविवाहित मुलीचे उत्पन्न व कुटुंबाचे उत्पन्न याचा विचार करून लाभार्थ्यांची पात्रता ठरवण्यात येते
- मुलीचा विवाह झाल्यानंतर तिच्या पालक कुटुंबाला अनुदान पुढे चालवण्यात येईल
- लाभार्थ्याच्या कुटुंबाचे एकूण एकत्रित उत्पन्न 21 हजार रुपये पर्यंत असल्यास लाभार्थी या योजनेअंतर्गत लाभ मिळण्यास पात्र होईल
- अपंगातील अस्थिव्य अंध मूकबधिर कर्णबधिर मतिमंद याच प्रवर्गातील अपंगांना या योजनेचा लाभ मिळण्याकरता त्यांचे एकत्रित कुटुंबाचे उत्पन्न या योजनेत पात्र होण्यासाठी 21000 रुपये पर्यंत असावे उत्पन्न जास्त असल्यास लाभ दिला जात नाही
Sanjay Gandhi Niradhar Yojana Maharashtra 2024 | योजनेच्या महत्त्वाच्या बाबी
- दरवर्षी 1 जानेवारी ते 31 मार्च या कालावधीत एकदा संबंधित लाभार्थ्यांनी त्यांचे जेथे आधार संलग्न बँक खाते जेथे आहे अशा अशा ठिकाणी जाऊन बँक मॅनेजर कडे किंवा पोस्ट ऑफिस मध्ये स्वतः हजर राहावे लागेल व तेथे हयात असल्याची नोंद करणे अनिवार्य राहील
- कोणत्याही कारणामुळे लाभार्थी बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये जर हजर राहू शकला नाही तर त्याला वर्तने नायक तहसीलदार तहसीलदार उपविभागीय अधिकारी (प्रांत अधिकारी) यांच्यासमोर हजर राहून हयातीबाबतचे प्रमाणपत्र संबंधित तहसीलदाराकडे सादर करावे
- कोणत्याही परिस्थितीत हयात प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय सदर लाभार्थ्याला दरवर्षी एक एप्रिल पासून हार्दिक सहाय्य व निवृत्ती वेतन देण्यात येणार नाही याची लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी
Sanjay Gandhi Niradhar Yojana Maharashtra 2024 | आवश्यक कागदपत्रे
- अर्जदाराचा फोटो ऑनलाइन अपलोड करावे लागतो
- ओळखीचा पुरावा इलेक्शन कार्ड सादर करू शकता
- पॅन कार्ड
- आधार कार्ड
- नीम शासकीय ओळखपत्र
- रहिवासी पुरावा संबंधित ग्रामपंचायतीचा तहसील तलाठी प्रमाणपत्र
- वयाचा पुरावा यामध्ये जन्म दाखला किंवा जन्मतारीख असलेले प्रमाणपत्र
- अपंग असल्यास संबंधित प्रमाणपत्र
- अनाथ असल्यास तसे प्रमाणपत्र सादर करावे लागेल
अशाप्रकारे या ब्लॉगमधून संजय गांधी निराधार योजने संदर्भात संपूर्ण माहिती पाहिली जर काही तुम्हाला योजना संदर्भात काही माहिती हवी असेल किंवा काही शंका असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की माहिती विचारा संपूर्ण मदत आमच्या मार्फत तुम्हाला दिली जाईल याबरोबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपला देखील तुम्ही जॉईन होऊ शकता आपल्या होम पेज वरती सदर व्हाट्सअप ग्रुप लिंक देखील देण्यात आले आहे नवनवीन अपडेट्स मिळवण्याकरता आपल्या साईडला सबस्क्राईब करा